पीएमएफएमई योजना-केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सन २०२०-२१ पासून ते सन ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी या शासकीय व खासगी वैयक्तिक तसेच संस्थांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदान लाभ देय आहे. तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधांकरिता गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे. मार्केटींग व ब्रेडिंगकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटी आहे.
काय आहेत योजनेचे उद्देश ?
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रेडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेचे उद्देश आहेत.
अर्ज कोण करू शकतात
कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी संस्था.
कोणते अन्नप्रक्रिया उद्योग
दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी.
मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.
पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासूनचा प्रक्रिया उद्योग, जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रेडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.
तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.
पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.
पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी.
कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे इत्यादी.
राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे.
🐟 सागरी उत्पादने – मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा, पकोडा, इत्यादी.
🧇 नाचणी – पीठ, पापड, बिस्कीटे, कुकीस, नाचणी सत्व,चकली, इडली, शंकरपाळी, इत्यादी. भगर पीठ,भगर,इत्यादी.
🥚 चिकू- स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम, कॅंडी, पावडर, ज्यूस,चॉकलेट,चॉकलेटबार,
फ्रुटबार,वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, इत्यादी.
🥭 आंबा- – पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद, ज्यूस, गोठवलेले, लोणचे, चटणी,फ्रुटबार, लश, सॉस, कुंदा,सॉफ्टकँडी,अल्कोहल विरहित पेय,इत्यादी.
🍌 केळी- चिप्स, प्यूरी, पल्प, वाईन, पावडर, वेफर्स, Concentrate, Figs, Flour, फ्रोझन स्लायसेस व डायसेस, जाम,फ्रुटी,बार, सुकेली टॉफी, ड्रायफ्रूट पिल कँडी,इत्यादी.
🧅 *कांदा* -फ्राईड कांदा, Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर, Strips , ऑईल, सॉस, लोणचे इत्यादी.
🍅 *टोमॅटो* -केचअप, जाम, प्यूरी, सॉस, कॅन टोमॅटो, पेस्ट, टोमॅटो चटणी, RTE ,सूप,ज्यूस, लोणचे,इत्यादी.
🥛🍦 दुग्ध व दुग्धजन्य – बासुंदी, पनीर,लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा,मावा,छन्ना, संदेश,पेढा, कलाकंद,कुल्फी, रबडी,बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला,इत्यादी.
🌽 ज्वारी – Flakes, पिठ, पापड, माल्ट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.
🌾 *गहू*- Flakes, पिठ, ब्रेड, माल्ट, बिस्कीट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.
🎋 *गुळ*- गुळ पावडर, ज्यूस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी.
🍇 *द्राक्षे*- बेदाणा, वाईन, ज्यूस, विनेगार, Sweet spreads, मनुका, वाईन स्वॅश, लोणचे,इत्यादी.
🌽 *मका*-कॉर्न सिरप, पीठ, Flakes, ऑईल, स्टार्च, Corn Stalk Fiddle, सॉस, पॉपकॉर्न इत्यादी.
🍊 मोसंबी- ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ॲसीड, Concentrate, Marmalade, ड्रायफ्रूट,इत्यादी.
🍈 सिताफळ- पल्प, जाम, जेली, पावडर, सीड ऑईल, आईसक्रिम, रबडी, बर्फी, ड्राइड स्नॅक्स, ज्यूस, कँडी,इत्यादी.
🍐 *पेरू*- ज्यूस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी, RTS पेय, वाईन, प्यूरी,चॉकलेट, चीज, फ्रुटबार, टॉफीज,इत्यादी.
🥗 *हरभरा*-बेसन पीठ, नमकीन, फूटाणे, डाळ इत्यादी.
🌿 *तुर* – डाळ,पीठ,इत्यादी.
🌾 *मुग*- पापड, डाळ, पीठ इत्यादी.
🥫 *हळद*-पावडर, ड्राईड रायझोम, इत्यादी.
🌶️ *मिरची*-पावडर, ड्राईड मिरची,Flakes, लोणचे,डीहायड्रेशन,इत्यादी.
🍊 *संत्रा*- ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ॲसीड, Mandarin Concentrate,, Marmalade तेल – mandarin essential oil, Clementine Oil , इत्यादी.
🥜 *सोयाबिन*- तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क, सोया प्रोटिन, सोया सॉस, सोया स्टिक, सोया चिप्स, पीठ, इत्यादी.
🥠 *जवस*-चटणी, तेल, इत्यादी.
🍚 *भात*- पोहा, मुरमूरे, पीठ, पापड, ऑईल, Parboiled Rice, Flakes, बिअर, इत्यादी.
🌲🎄 *किरकोळ वन उत्पादने* -हिरडा पावडर, महुवा- तेल/पावडर/केक /बिस्कीट/ कुकीस/लोणचे/ इत्यादी. मशरुम- सुकवलेले मशरुम/बिस्कीट/कुकीस,मध, डिंक,इत्यादी.
योजनेचा उद्देश
सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे ODOP उत्पादनांवर आधारीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी , स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे.
उत्पादनांचे ब्रॅन्डींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
महाराष्ट्रातील 21998 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधा, साठवणुक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.
मार्गदर्शन व प्रशिक्षण. – प्रकल्प अहवाल बनवणे, ऑनलाइन अर्ज करणे, बँकांशी पाठपुरावा करणे, विविध परवाने काढणे इत्यादिसाठी संसाधन वेक्ती कडून मदत.
पात्र लाभार्थी
अ) वैयक्तिक लाभार्थी – वैयक्तिक लाभार्थी,भागीदारी संस्था,बेरोजगार युवक, महिला,प्रगतशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP), भागिदारी संस्था इ.
उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी/भागीदारी) असावा.
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.
पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बॅंक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.
ब) गट लाभार्थी – शेतकरीगट/ कंपनी/संस्था, स्वयंसहाय्यता गट,उत्पादक सहकारी संस्था इ.
“एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहायता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना नवीन उद्योगाना प्राधान्य दिले जाईल.
कंपनीची उलाढाल ही किमान रु.१ कोटी असावी.
कंपनीच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये.
कंपनीच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान व अनुभव असावा, तसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
प्रकल्प किंमत व खेळत्या भांडवलासाठी 10-40% स्वनिधी भरण्यासाठीची तरतूद शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असावी किंवा सदर रक्कमची राज्य शासनाची हमी असावी.
PMFME Scheme Subsidy
मार्केटिंग व ब्रँडिंग:- पात्र प्रकल्पाच्या 50% अनुदान
सामान्य पायाभूत सुविधा:- पात्र प्रकल्पाच्या 35%अनुदान
पात्र प्रकल्प – नाशवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशुउत्पादन, किरकोळ वनउत्पादने इ. मध्ये सद्यस्थितीत कार्यरत- ODOP/ Non ODOP उत्पादनांमध्ये कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी/विस्तारीकरण/ आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतील. नविन स्थापित होणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केवळ ODOP पिकांमध्ये असावेत.
आर्थिक मापदंड
वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% जास्तीत जास्त रु. 10.00 लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरील PMFME MIS PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात.
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था /कंपनी, स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभुत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता इ. करिता बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे. याकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.या घटकासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केले जातील.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना खेळते भांडवल व छोटी मशिनरी घेण्याकरिता प्रती सदस्य रु. 40,000/- बीज भांडवल रक्कम देण्यात येणार आहे. स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोन्नती अभियान (MSRLM) यांचेमार्फत राबविले जातात. त्यासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील NRLM PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात. तसेच स्वयंसहाय्यता गटाच्या वैयक्तिक सदस्यास भांडवली गुंतवणूकीकरीता पात्र प्रकल्प किंमतीच्या 35% व कमाल रु.10 लाखाच्या मर्यादेत बँक कर्जाशी निगडीत अनुदान दिले जाईल.
अधिक माहिती करीता येथे आपली माहिती भरून देण्यात यावी आपल्याला आमच्या प्रतिनिधी मार्फत मार्गदर्शन करण्यात येईल.
Add comment