जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव आणि SHGMade™ यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, प्रशिक्षण कार्यक्रम
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव आणि SHGMade™ यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, आम्ही आपल्या बचत गटांच्या उद्योगात वाढ होण्याकरीता व बचत गटाकरीता नवीन उद्योगधंदा स्थापित करण्याकामी प्रशिक्षण व एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करीत आहोतउद्योगधंदा निवड
बचत गटातील बाजारातील कल, स्पर्धा, भौगोलिक परिस्थिती, गटाकडे असलेली कौशल्ये आणि गटा मधील क्षमता यांचे विश्लेषण होवून बचत गटाचा उद्योग धंद्या निवड कशी करावी या बाबत मार्गदर्शन करतीलनिधी उपलब्धता
व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकदा साहित्य खरेदी करणे, मशीन्स घेणे आणि कर्मचारी नियुक्त करणे यासारख्या खर्चाची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आगाऊ भांडवल आवश्यक असते, जसजसा व्यवसाय वाढत जातो, तसतसे नवीन उत्पादनाचे प्रक्षेपण करणे किंवा उत्पादन वाढवणे यासारख्या विस्ताराच्या प्रयत्नांना वित्तपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असू शकते या बाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.उद्योग व्यवसाय शासकीय परवाना
उद्योग व्यवसाय स्थापन करीत असतांना शासनाच्या अनेक परवानगी ची आवश्यकता असते सदरची परवानगी कशी मिळवावी व त्या करीता लागणारे कागत पत्रे तयार करण्याबाबत या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे जसे पापड लोणची विकण्याकरीता अन्न सुरक्षा विभागाकडून परवाना आवश्यक असतोशासकीय कर व नियम
या अंतर्गत शासनच्या कर (GST)प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे सदरचे प्रमाणपत्र व कर पद्धती या वर मार्गदर्शन करण्यात येणे शक्य होणार आहे व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपयोग होणार आहेव्यवसाय डीजीटल
एकविसाव्या शतकात उद्योग व्यवसाय करणे असल्यास सदरच्या व्यवसाया करीता डीजीटल स्वरुपात करणे गरजेचे आहे जसे ई-मेल ,गूगल नोंदणी व इतर बाबींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहेसोशल मिडीया मार्केटिंग
सद्यस्थितीमध्ये वस्तू विकण्याचे सरावत मोठे साधन सोशल मिडीयामिड आहे फेसबुक,इन्स्टाग्राम व ईतर सोशल मिडीया वर आपले उत्पादन कसे विकावे याचे प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे .ई-कॉमर्स (मार्केटप्लेस) विक्री
आपले उत्पादन संपूर्ण देशात विकण्याचे साधन ई-कॉमर्स (मार्केटप्लेस) विक्री होय या वर आपले उत्पादन कश्या पद्धतीत असावे व सदरच्या उत्पादन विक्री कशी वाढवावी या बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहेउत्पादन दळणवळण व्यवस्थापन
उत्पादनाची ओर्डेर आल्यावर पैसे घेवून उत्पादन घरपोच कसे पोचवावे या बाबतचे मार्गदर्शन या अंतर्गत करण्यात येणार आहेउत्पादन ब्रेंडीग
या अंतगर्त महिला बचत गटातील उत्पादने कशा प्रकारे ब्रेंडीग करण्यात येतील व त्या करीता काय करावे लागते या संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेउत्पादन पैकेजिंग
उत्पादन विक्री वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे पैकेजिंग करणे अत्यंत गरजेचे असते या करीता चांगल्या प्रतीची पैकेजिंग कशी करावी व त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे दिनांक १४/१२/२०२३ व १५/१२/२०२३ रोजी सदरची एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्याचे नियोजले आहे तरी लवकरचकार्यक्रम स्थळ आपणास कळवण्यात येईल.
Add comment